देवळाली प्रवरात कोविड सेंटरचे उदघाटन
राहुरी :
राहुरी तालुक्यातल्या देवळाली प्रवर परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरज ओळखून सत्यजित कदम फाउंडेशन आणि स्थानिक डॉक्टर्स यांच्या पुढाकाराने सर्व सोयी सुविधांनी युक्त असं ५० बेडचे कोविड सेंटरचे उदघाटन गुरुवारी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यजित कदम फाउंडेशन आणि स्थानिक डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या छोटेखानी उदघाटन भाजपचे प्रभारी लक्ष्मणराव सावजी यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते. यावेळी माजी आ. शिवाजी कर्डीले, प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुख्याधिकारी अजित निकत, सरचिटणीस दिलीप भालसिंग, प्रसाद ढोकरीकर, रमेश पिंपळे आदी उपस्थित होते.