ठरलेल्या आवर्तनानुसार पाणी सोडा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

481

सातारा दि.23 (जिमाका) : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी सोडा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
जुलै महिन्यात प्रचंड असा पाऊस पडला. या पाऊसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी सोडा. शेतकऱ्यांकडील पाणी पट्टी वसुलीसाठी साखर कारखान्यांनी सहकार्य करावे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here