जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली गोगाबाबा टेकडी येथील वृक्षरोपणाची पाहणी.

496

इको बाटालियनने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन केले आहे. त्यांचे काम लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गोगाबाबा टेकडी येथील परिसरात वृक्षरोपणाचे कार्य त्यांना दिले होते.

• गेल्या वीस दिवसांमध्ये याठिकाणी ६२५० रोपांची लागवड करण्यात आली आहे.

• गुरांच्या चरण्यामुळे नुकसान झालेल्या अडीशे ते तीनशे रोपांची पुन्हा लागवड करण्यात आली आहे.

• जिल्हाधिकारी यांना सुभेदार राजेश गाडेकर यांनी सम्पूर्ण परिस्थतीचा सविस्तर आढावा देताच जिल्हाधिकारी यांनी तातडीने भावसिंगपुरा आणि पदमपुरा भागामध्ये गुराढोरांना गोगाबाबा टेकडी येथे न चारवण्यासाठी भोंग्याच्या माध्यमातून अवाहन करण्याचे आदेश संबंधीताना दिले.

• तसेच CSR च्या माध्यमातून वृक्षांसाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबतचा मानस त्यांनी बोलून दाखवला. लवकरच औरंगाबाद ऑक्सिजन हब बनेल असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here