श्रीगोंदा : कोळगाव ता. श्रीगोंदा येथे एमएलसी प्रकल्पाअंतर्गत प्रचेता क्लिनफ्युअल प्रा.लि. व शिधा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाने हत्ती गवताच्या (नेपिअर गवत) प्रक्रियेतून जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची सुरुवात करण्यात आली. यापासून प्रकल्पातून खनिज तेलाला पर्यायी इंधन आणि सेंद्रिय खत निर्मितीही करण्यात येणार आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी पोहोचले असून सातत्याने इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. पर्यायी इंधन म्हणून भारत सरकारने प्लल बायो सीएनजी प्रकल्प , बायो पीएनजी प्रकल्प व सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य दिले आहे. कोळगाव येथील जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे, एमएलसी कंपनी प्रतिनिधी रणजित दातार, प्रचेता क्लीन फ्युअल कंपनी प्रतिनिधी हेमंत उपोरे, माजी सभापती पुरूषोत्तम लगड, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे संचालक दादासाहेब साबळे, हेमंत नलगे, बाळासाहेब मोहरे, बाळासाहेब नलगे, डी.एल लगड, प्रेमकाका भोईटे, मयूर पंधरकर, उपसरपंच अमित लगड यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. हे पण पहा – दोन ढाण्या वाघ एकत्र आले कि गर्दी होते । इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन। हत्ती गवताला गनिगोल , नेपिअर गवत देखील संबोधले जाते. या गवतावर प्रक्रिया करून जैविक इंधन निर्मिती करण्यात येणार असून प्रति टन एक हजार रुपये भावाने हे गवत कंपनी खरेदी करणार आहे. या कंपनीची शेतकरी सभासद फी २५० रुपये व शेअर फी २५० रुपये असून क्षमतेनुसार शेअर विकत घेता येणार आहेत . तालुक्यात किमान दहा हजार सभासद करण्यात येणार आहेत.यानंतर सभासद शेतकऱ्यांना बियाणे पुरवणे या पिकासाठी लागणारी सेंद्रिय खते पुरवणार आहेत . साधारण तीन महिन्यात हे पीक काढणीयोग्य झाल्यानंतर कंपनी स्वत:च्या खर्चाने विकत घेणार आहे . हे गवत साधारण दोन महिन्यात १५ ते २० फुटांपर्यंत वाढते. साधारणतः वर्षातून चार वेळा कापणीस येते . एक एकरात किमान ४० ते ५० टनाचे उत्पादन मिळून भरघोस आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे .




