माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू

727

माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई : मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असताना एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये सचिन देशमुख यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 52 वर्षांचे होते.
सचिन देशमुख हे एक अष्ठपैलू क्रिकेटपटू होते. मुंबई आणि महाराष्ट्र रणजी संघात ते खेळले होते. मात्र, प्लेइंग इलेवनमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. सचिन देशमुख हे मुंबईत एक्साइज एंड कस्टम डिपार्टमेंटमध्ये सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत होते.

‘दी टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपात्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सचिन देशमुख यांच्या नेतृत्त्वातील 1986 मध्ये झालेल्या कूच विहार ट्रॉफीत संघातने धमाकेदार कामगिरी केली होती. सचिन यांनी स्वत: 3 सामन्यात 3 शतके ठोकले बोते. त्यात सचिन यांनी 183, 130 आणि 110 अशा धावा केल्या होत्या, अशी माहिती सचिन यांचे जवळचे मित्र अभिजीत देशमुख यांनी दिली.

90 दशकात इंटर यूनिर्व्हसिटी टूर्नामेंटमध्ये सचिन देशमुख यांनी दमदार कामगिरी केली होती. 7 सामन्यात सलग 7 शतके ठोकून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. सचिन हे मधल्या फळीतील धमाकेदार फलंदाज होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here