डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
??♂️ रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळावं, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत थकित वेतन मिळावं, यासाठी पदाधिकाऱ्याने कुलसचिवांच्या कार्यालयातच धिंगाणा घातला.
▪️कार्यालयात यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
कामगारांचं शोषण करणाऱ्यांचा धिक्कार असो,
वेतन थकवण्याला जे कुणी संबंधित असतील त्यांच्यावर ॲक्शन घ्या,
त्यांना मेमो पाठवा, असं सांगत आमचं वेतन तात्काळ जमा करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.