मंत्रिमंडळनिर्णय
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क यासाठी प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये याप्रमाणे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळनिर्णय
लॉकडाऊनच्या काळातील उत्पादित दूध भूकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (#महानंद) यांना वर्किंग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांकडून प्रतिदिन १० लाख लिटर दूध घेऊन त्याचे दूध भूकटीमध्ये रुपांतरण करण्याची योजना राबविण्यात आली होती.
मंत्रिमंडळइतरवृत्त
कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या उपाययोजना व नागरिकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधितेचा दर २.४४ टक्के आहे. आरोग्य विभागाने सद्यस्थितीबाबत यावेळी सादरीकरण केले.
मंत्रिमंडळइतरवृत्त
औरंगाबादमध्ये ७वी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दीपक जाधव या मुलीने स्पर्धेत मिळालेली पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली. तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र मंत्रिमंडळ बैठकीत वाचून दाखविण्यात आले. यावेळी सर्व मंत्र्यांनी तिचे कौतुक केले.