तर तहसीलसमोर ‘आत्मक्लेश आंदोलन करणार
अहमदनगर :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधूनही कोरोनाही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.
तसेच अकोले तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी दिला.
शासकीय विश्रामगृह अकोले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजित नवले म्हणाले की,कोरोनाचे रुग्ण आढळून आले की,दोन चार कार्यकर्ते बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतात.
त्यामध्ये गोर गरीब जनतेचे हाल होत असून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न तयार होत आहे.मुळात बंद हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव पर्याय नाही.कोरोनाच्या टेस्ट वाढविणे गरजेचे आहे,कोव्हीड सेंटर अथवा कोव्हीड हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे. तालुक्यातील कोव्हीड सेंटरची अवस्था फार दयनीय आहे.










