आळंदी: एका दुकानदार तरुणाचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्षाने दुकानदार तरुणाकडून दोन लाख 84 हजार रुपयांची खंडणी घेतली. ही घटना डिसेंबर 2020 ते दोन एप्रिल 2021 या कालावधीत आळंदी येथे घडली.दत्ता लक्ष्मण झिटे (वय 30, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू सुभाष कु-हाडे (रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आळंदी-मरकळ रोडवर रमेश स्वीट होम नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांचा एका महिलेसोबत वैयक्तिक वाद झाला. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी महाराष्ट्र एल्गार सेनेच्या अध्यक्ष विष्णू याची ओळख झाली.फिर्यादी यांनी आरोपीला फिर्यादी आणि महिलेचे भांडण मिटवून देण्याची विनंती केली. ते भांडण मिटविण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख, गुगल पे, क्रेडिट कार्ड द्वारे एकूण दोन लाख 84 हजार रुपये खंडणी घेऊन मानसिक त्रास दिला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
Ahmednagar |सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या | नगर तालुका पोलिस ठाणे यांची कर्तबगारी
सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
नगर तालुका पोलिस ठाणे यांची कर्तबगारी
नगर प्रतिनिधी ( शितल बेद्रे.)
ठेकेदाराचा मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
Jalgaon News : स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी अतुल वंजारी हा दुसरा वाल्मीक कराड असल्याचा गंभीर आरोप...
नगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठा बदल, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं, सचिन जाधवांकडे शहर प्रमुखपदाची जबाबदारी
अहमदनगर : आगामी18विधानसभा Sabha निवडणुकीच्या (Vidhan Election) पार्श्वभूमीवर नगर शहर शिवसेना शिंदे गटात...
Collector : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बुरुडगाव रस्त्यावरील साडेबारा एकरांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द
३०० कुटुंब विस्थापित हाेणार; पाेलीस बंदाेबस्त तैनात; जमिनीचा ताबा मूळ वारसांना देणार
Collector :...




