लातूर जिल्हयाला गरजेनुसार ऑक्सीजनचा
मुबलक पुरवठा केला जाणार
आरोग्य विभागाने जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना करण्यात येत असलेल्या ऑक्सीजन पुरवठयाची माहिती घ्यावी. प्रत्येक रुग्णांना प्रतिदिन किती ऑक्सीजनची आवश्यकता आहे व त्याप्रमाणे ऑक्सीजनचा पुरवठा करण्याचे योग्य नियोजन करावे. लातूर जिल्हयाला गरजेप्रमाणे मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे अहमदपूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कोवीड-19 आढावा बैठकीत सांगगितले.
यावेळी आमदार बाबसाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव,लातूर महापालिका आयुक्त देविदास टेकाळे,प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,डॉ.उदय मोहिते, उपविभागीय अधिकारी प्रभुदेय मुळे, तहसिलदार महेश सावंत अन्य विभागप्रमुख व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हयातील प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयाच्या ऑक्सीजनचा पुरवठा व वापराबाबतचे ऑडिट करण्यात यावे. रुग्णांच्या गरजेनुसार ऑक्सीजन पुरवठा करण्यात यावा. एखादया रुग्णालयात ऑक्सीजनचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हयात कोठेही ऑक्सीजनची साठेबाजी होणार नाही याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, असे या बैठकीत सूचित केले आहे.
अहमदपूर-चाकूर तालुक्यात वैद्यकीय सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध् करुन दयाव्यात. तालुकास्तरावरील कोवीड केअर सेंटर मध्ये सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा असल्या पाहीजेत. रुग्णालयातील साफ सफाई व स्वच्छता नियमित करावी. व तालुकास्तरावर समर्पित कोवीड रुग्णालय सुरु करता येईल का ? याचा अहवाल प्रशासनाने सादर करावा, असे निर्देश यावेळी दिले आहेत.
अमित विलासराव देशमुख