भिंगार: वाहनअडून आरोपीवर प्राणघातक हल्ला ; भिंगार मध्ये घटनाअहमदनगर: भिंगार ठाण्याचे पोलीस फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात असताना इतर पाच आरोपींनी पोलिसांचे वाहन अडवून त्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला.नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ रविवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार (22) हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता आरोपीच्या घरी गेले होते. त्याला घेऊन जात असताना पाच आरोपींनी भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन अडवून सादिकला मारहाण केली. ही घटना मी प्रत्यक्षात पाहिली असल्याचे रुक्सार सादिक हिने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेला सादिक याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
“जयला थोडं थंड होण्यासाठी आग्रह करा”: शशी थरूर यांचा एस जयशंकर यांना सल्ला
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी सोमवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना इतर...
ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
Mumbai:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द.आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम...
ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द.आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले...
Mumbai: Over 10 shops gutted in fire on fashion street. Details here
At least 10 roadside shops in Mumbai Fashion Street were gutted in a fire on Saturday afternoon,...