कर्जत उप जिल्हा रुग्णालयातील आॉक्सिजन प्लँटचा पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

548

अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कर्जत उप जिल्हा रुग्णालयातील बुस्टर यंत्रणेसह उभारण्यात आलेल्या आॉक्सिजन प्लँटचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री तथा

जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज झाला. आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक आॉक्सिजनचा पुरवठा उप जिल्हा रुग्णालय स्तरावर व्हावा आणि रुग्णांना त्यासाठी शहरात येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी उपयोगी असलेल्या लिक्विफाईड मेडिकल आॉक्सिजन निर्मिती प्रकल्प केंद्राचे भूमीपूजनसुद्धा यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.


000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here