पालघर दि.14 : पालघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय संकुलातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मुख्य इमारतीची तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या दालनाला भेट देऊन कृषी माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 19 ऑगस्ट रोजी इमारतीचे लोकार्पण होणार आहे. याबाबतीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तयारीचा आढावा यावेळी घेतला
यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,
वसई विरार महानगपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन पालघर उपविभागीय अधिकारी धनाजी तुलसकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दालनाला भेट देऊन कामाची पाहणी केली अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या या शासकीय इमारतीमध्ये कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन तसेच योग्य त्या सूचना केल्या




