आपल्या स्वतःच्या शेतात प्राथमिक अंदाजा नुसार विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे .

844

तळेगाव शेळगाव ता.जामनेर येथील प्रभाकर गणपत डोळसे वय ४२ यांनी आपल्या स्वतःच्या शेतात प्राथमिक अंदाजा नुसार विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे .

घटनेची जामनेर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असुन शेतकऱ्याचा स्वतः च्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे घटनास्थळावरच डॉ. हर्षल चांदा यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले .

मृत शेतकरी प्रभाकर डोळसे यांच्या पश्चात पत्नी मुलगा वय१३ वर्ष मुलगी ७ वर्ष आई व दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्यावरती शेतीचे कर्ज असल्याचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले.

तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व त्यानंतर आलेली कपाशी सुद्धा कमी भावात विकावे लागले त्यामुळे कर्जबाजारी झालेले व नापिकीला कंटाळलेले प्रभाकर डोळसे यांनी शेवटी मृत्युला कंवटाळले आत्महत्या केली.

सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँ संजय पाटील ,नाईक ,किशोर परदेशी करीत असून संजय पाटील रामदास कुंभार राहुल पाटील आदी सहकार्य करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here