स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवः ‘मेरा मान, मेरा राष्ट्रगान’ मोबाईलवरुन अपलोड करा राष्ट्रगीत गायनाचा व्हिडीओ

808

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवः ‘मेरा मान, मेरा राष्ट्रगान’
मोबाईलवरुन अपलोड करा राष्ट्रगीत गायनाचा व्हिडीओ

अकोला,दि.१४(जिमाका)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत ‘मेरा मान, मेरा राष्ट्रगान’, या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याअंतर्गत नागरिकांनी राष्ट्रगीत म्हणतांनाचा स्वतःचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्यासाठी www.amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर जाऊन प्रथम क्यूआर कोड स्कॅन करावा, त्यानंतर वैयक्तिक माहिती नमूद करावी, त्यानंतर उभे राहून राष्ट्रगीत गातांना व्हिडीओ रेकॉर्ड करावा व नंतर व्हिडीओ अपलोड करावा. हे व्हिडीओ www.rashtragaan.in या वेबसाईटवर १५ ऑगस्ट रोजी दाखविण्यात येतील. नागरिकांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here