Maha 24 News महत्वाच्या बातम्या

457

▪️राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा फैसला, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी समन्वयाने प्रश्न सोडवावा, कोर्ट राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, तसंच इतके दिवस जागा रिक्त ठेवणंही योग्य नाही..

▪️राजकारणी थापा मारतात, दर महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणं अवघड.. सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावालांचा ‘डोस’.. दोन वेगवेगळ्या लसीचं कॉकटेल करण्याला कडाडून विरोध.

▪️India vs England 2nd Test : भारतीय संघाचा डाव ३६४ धावांवर गुंडाळला. दुसऱ्या दिवशी रिषभ पंत 37, रवींद्र जाडेजाचे 40 धावांचे योगदान. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनचे सर्वाधिक पाच बळी.

▪️तमिळनाडू विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन. पहिल्यांदाच ई-बजेट सादर. पेट्रोल कर तीन रुपये कमी केला. सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा 12 महिने. बचतगटांना 20,000 कोटी रुपये क्रेडिट देणार

▪️नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटकेनंतर एक दिवसांची पोलीस कोठडी, 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी होत्या फरार.

▪️देशात गेल्या 24 तासांत 40 हजार कोरोनाबाधितांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्येत भारत 11व्या स्थानी.. राज्यात गुरुवारी 5,609 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद..

▪️आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम. सेन्सेक्स 593.31 अंकांनी वाढून सर्वोत्तम 55,437.29 अंकांवर बंद, निफ्टीतही 164.70 अंकांनी वाढून 16,529.10 अंकावर.

▪️आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘आयएसआयएस’शी संबंधित परभणीच्या इक्बाल अहमद कबीर अहमदला मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका.

▪️भाजपतर्फे येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील नवीन केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढणार. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड महाराष्ट्रभर फिरणार.

▪️हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले .. लॉकडाऊननंतर 25 मे 2020 रोजी हवाई सेवा सुरू करण्यात आली होती.
➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here