स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापनदिनी
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण
अलिबाग,जि.रायगड (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी, सकाळी 09.05 वाजता, कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रायगड जिल्हा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे.
हा सोहळा घरी बसून पाहण्यासाठी
https://www.facebook.com/dioraigad06
या फेसबुक पेजला क्लिक करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा, अशी सूचना शासनाकडून देण्यात आली आहे.
करोना विषाणू प्रादूर्भावाची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम करोना प्रतिबंधक उपाययोजनांसंबधीचे सर्व नियम पाळण्यात यावेत तसेच हा कार्यक्रम साजरा करताना करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचेही काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
00000





