मोठी बातमी, मुंबईतील हॉटेल चालकांच्या लढ्याला यश, रात्री 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

476
  • मुंबई : कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आलंय.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना  दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची  सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मॉल्स आणि चित्रपटगृहे यांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणातही निर्णय अद्याप समोर आलेला नाही.

सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा‌ अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय.  सामान्य प्रशासन विभागाच्या सुजाता सौमिक‌ या चाय अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.आरक्षणाबाबात कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास‌ ही समिती करणार आहे. यानंतर नोकरीतल्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षण, एसईबीसी आरक्षण यासंदर्भात‌ कोर्टाच्या निर्णयाचा‌ ही समिती अभ्यास करणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत खालील विषयांवर चर्चेची शक्यता असल्याचं समजतंय.

3 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त कायम करणे

राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा
कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा आणि सादरीकरण
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रीत) या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याबाबत
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सादरीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here