खुशखबर! राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती होणार
अहमदनगर :-लॉकडाऊन मध्ये अनेकांचे नौकऱ्या गेल्या यामुळे मोठी बेरोजगारी निर्माण झाली.
मात्र आता देशातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. राज्यात तब्बल 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. तसेच अनेक परीक्षा रद्द झाल्या, यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बेरोजगार तरुण चांगलेच चिंतेत होते.





