??♂️ औरंगाबाद येथील गिर्यारोहक अंबादास गायकवाड हे रशियाच्या माऊंट एलब्रुस मोहीमेसाठी नुकताच रवाना झाले आहे.
?? त्यांच्या या मोहीमेसाठी मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार, श्री. नितीनजी गडकरी यांनी भारतीय ध्वज व हिरवी झेंडी दाखवुन मोहीमेसाठी शुभेच्छा दिल्या.
?? अंबादास गायकवाड हे १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन रशियाच्या माऊंट एलब्रुस येथे भारतीय राष्ट्रध्वज फडकावुन साजरा करणार आहे.
?️ माऊंट एलब्रुस येथे जाणारे अंबादास गायकवाड हे महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाचे पहिले कर्मचारी आहे.
?माऊंट एलब्रुस या शिखराची उंची १८५१० फुट आहे. या पुर्वी अंबादास यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी द. अफ्रिकेतील माऊंट किलीमंजारो शिखर सर केले होते.
?️ भारत सरकार, इंडियन आर्मी, महाराष्ट्र शासन, मा. मुख्यमंत्री, आरोग्य विभाग, महाराष्ट्र पोलिस, मा. मनपा आयुक्त, मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस आयुक्त, पत्रकार समुह, सेवाभावी संस्था, रक्तदाते, कोरोना योद्धा, सफाई कामगार तसेच विवीध सामाजिक घटक ज्यांचे कोविड-१९ या महामारीच्या काळात अमुल्य योगदान आहे त्यांना सदरची मोहीम समर्पित करण्यात येत आहे असे अंबादास यांनी सांगीतले.






