सण, उत्सवाच्या कालावधीत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

747

सण, उत्सवाच्या कालावधीत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

अकोला,दि.९(जिमाका)- जिल्ह्यात दि.९ ते २३ ऑगस्ट या कालावधीत असलेल्या विविध सण उत्सवाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मुंबई पोलीस अधिनियम कलम ३६ नुसार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरील दर्जाच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना खालील बाबींचे अधिकार प्रदान केले आहेत.
रस्त्यावरील मिरवणूकीतील वर्तणूक ठरविणे, त्याविषयी निर्देश देणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी निर्माण होऊ न देणे, मिरवणूकांचे मार्ग ठरविणे, सार्वजनिक जागांवर बंदोबस्त ठेवणे, वाद्य वाजविणे बाबत नियम तयार करुन नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागी लाऊड स्पिकरचा वापर करणे इ. बाबींचा या अधिकारात समावेश असून या आदेशान्वये यासंदर्भातील आदेश काढणे व या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध कारवाई करणे बाबतही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज दिलेल्या आदेशात निर्देश दिले आहेत.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here