ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन

501

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना अभिवादन

मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना अभिवादन केले आहे. तसेच कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहनही केले आहे.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, मुंबईतील गवालिया टँकवर ‘करेंगे या मरेंगे’ अशी प्रतिज्ञा घेऊन ब्रिटीशांना ‘चले जाव..! भारत छोडो !’ असा निकराचा इशारा देण्यात आला. क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. या संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन करूया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपलं घर- कुटुंब, परिसर, वाडी-वस्ती, गाव-शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा घेऊया, त्यासाठी आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here