शहर कार्याध्यक्षपदी मूसैफ शेख

    837

    शहर कार्याध्यक्षपदी मूसैफ शेख

    नगर : संपूर्ण महाराष्ट्रात एम.आय.एम.चा प्रभाव वाढत असून, संघटन दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम जोरात सुरु असून, विद्यार्थी संघटनही कार्यरत आहे. विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाहनवाज़ तांबोळी यांनी जिल्ह्यात आणि शहरात विद्यार्थी संघटन वाढवण्याचे काम सुरु केले आहे. त्या अनुषंगाने नगर शहरात मुसैफ़ शेख यांना एमआयएम नेते क़दीर शेख यांच्या हस्ते विद्यार्थी संघटना शहर कार्याध्यक्ष पद देण्यात आले. नवनिर्वाचित शहर कार्यअध्यक्ष मुसैफ़ शेख यांनी सर्वांचे आभार मानून पक्षाला व संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करीन व लवकरच शहरची कार्यकारणी जाहीर करीन असे सांगितले. यावेळी युवा नेते आमिर खान, शहर अध्यक्ष सनाउल्लाह खान(तांबटकर), मुबीन शेख, अबरार शेख, अरबाज़ शेख कयूम कुरैशी, राशिद मोमिन, जैद शेख, अखलाक शेख, अमान खान, पृथ्वी वाघमारे, सुफियान कुरेशी, ज़ामिन कुरेशी, फैज़ान शेख, अल्तमश शेख, शाहिद शेख समीर शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here