100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्यावतीने कोरोना योद्धयांचा गौरव करण्यात आला.
शिक्षकांनी शिक्षण देण्याबरोबरच समाजाप्रती आपलेही काही देणे लागत असून आपली बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व असले पाहिजे या पद्धतीचे कार्य ‘100 शिक्षक क्लब ऑफ जालना’ यांच्यावतीने करण्यात आले. राज्यातील सर्व शिक्षकांना दिशादर्शक ठरेल असा आदर्श निर्माण केला.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे , आ. कैलास गोरंट्याल, आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, विजयअण्णा बोराडे, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, राजाभाऊ मगर, आर.आर. जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.