श्रावणमास निमित्ताने खुलताबाद-वेरूळ रस्त्यावर जड वाहणांसाठी वाहतूक बंद
↪️ शनिवार ते सोमवार या मार्गावरील जड वाहतूक वळविण्याचा निर्णय..
? श्रावणमास निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या खुलताबाद आणि वेरुळ या धार्मिक स्थळांना भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जात असतात.
??यावर्षी मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असली तरी भाविक जातीलच अशी शक्यता असल्याने पोलिसांनी शनिवार ते सोमवार या मार्गावरील जड वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
? जड वाहणांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा ??
↪️औरंगाबादहून कन्नड, धुळ्याकडे जाणाऱ्या सर्व जड वाहणांनी दौलताबाद टी पॉइंट-माळीवाडा-आनंद धाबा-कसाबखेडा फाटामार्गे वेरुळ कन्नडकडे जावे.
तर
कन्नडकडून येणाऱ्या जड वाहणांनी वेरुळ-कसाबखेडा फाटा- माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे यावे.
??फुलंब्रीमार्गे खुलताबाद, कन्नडकडे जाणाऱ्या सर्व जड वाहणांनी औरंगाबाद- कसाबखेडा फाटा-वेरुळ मार्गे कन्नड कडे जावे.
तर
वेरूळ खुलताबाद फुलंब्री कडे जाणाऱ्या वाहणांनी वेरूळ- कसाबखेडा फाटा-माळीवाडा मार्गे औरंगाबाद कडे जावे.
? खालील रस्त्यांवर वाहतूक बंद राहील –
➖श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत वरील मार्गांवर जाणारी सर्व अवजड वाहतूक दौलताबाद टी पॉइंट पासून वेरूळ पर्यंत व फुलंब्री ते खुलताबाद पर्यंत भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात येणार असल्याचे औरंगाबाद ग्रामीण वाहतूक पोलिसांमार्फत कळविण्यात आले आहे.





