*
✒️ बारावीनंतरच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूबरोबर झालेल्या बैठकीत सीईटी घेतली जाणार नसल्याचा निर्णय; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहीती
✒️ भारत-इंग्लंड पहिली कसोटी: इंग्लंड पहिल्या डावात 183 धावांवर ऑलआउट, जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद शमीने घेतले 3 बळी; भारताच्या पहिल्या डावात 13 षटकात बिनबाद 21 धावा
✒️ व्होडाफोन-आयडिया लि.चे बिगर कार्यकारी संचालक आणि बिगर कार्यकारी अध्यक्षपदाचा कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला राजीनामा
✒️ केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठे पाऊल उचलत 102 वी घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला दिली मंजुरी; आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही – अशोक चव्हाण
✒️ महाराष्ट्रात 72,810 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 61,17,560 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,33,410 रुग्णांचा मृत्यू
✒️ ‘तुमच्या वडिलांच्या नावाची विमा पॉलिसी सोडवण्यासाठी पैसे भरा,’ अशी बतावणी करून एकाला तब्बल 25 लाख 59 हजार 47 रुपयांना फसवलं; कराड ग्रामीण पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
✒️ राज्यातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर अधिक; या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्याचा आरोग्य विभागाचा निर्णय
✒️ भारतात 4,04,648 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,09,67,223 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,26,321 रुग्णांचा मृत्यू
✒️ कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आज घोषणा होणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज 3 वाजता करणार घोषणा; घोषणेनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणार लॉटरी
✒️ बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन