✒️ अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीही देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा केंद्रीय प्राधिकरणांचा विचार; निती आयोगाच्या सूचनेनंतर चाचपणी सुरू
✒️ ‘लालबागचा राजा’ यंदा मंडपात विराजमान होणार, यंदाचा गणेशोत्सव शासन निर्णयानुसार होणार असल्याची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली घोषणा
✒️ भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास: 1972 नंतर पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले; क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनला 3-1 ने हरवले
✒️ महाराष्ट्रात 78,962 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 60,94,896 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,32,948 रुग्णांचा मृत्यू
✒️ Tokyo Olympics: कुस्तीपटू सुशील कुमारनंतर वैयक्तिक ऑलिम्पिकची दोन पदके मिळवणारी सिंधू दुसरी भारतीय खेळाडू ठरली, सिंधूने रियो आणि टोकियो या दोन स्पर्धेत पदक जिंकले
✒️ पुण्यातील नांदेड सिटीमध्ये हादरवून टाकणारी घटना, 17 वर्षीय तरुणीची 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत तरुणी होती नॅशनल हॉर्स रायडर
✒️ आसाम आणि मिझोरम या उत्तर-पूर्व राज्यातील सीमा वाद संपण्यासाठी आता उपग्रहाची मदत घेतली जाणार; उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्रश्न सोडवणार
✒️ अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत सोबत करार
✒️ दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये 09 ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार
✒️ पेगासस हेरगिरी प्रकरण: सर्वोच्च न्यायालयात 5 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी; याचिकाकर्त्याने SIT चौकशी करण्याची केली होती मागणी
✒️ भारतात 4,08,343 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,08,49,681 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,24,808 रुग्णांचा मृत्यू
✒️ देशात तीन तलाकची प्रकरणे 80% कमी: कायदा लागू होण्यापूर्वी यूपीमध्ये होती 63 हजार प्रकरणे, जी कमी होऊन 221 राहिली; बिहारमध्ये 49 प्रकरणेच आली समोर






