बिग बाजार मॉलवर तोफखाना पोलीस आणि मनपाची कारवाई!!

1183

अहमदनगर-(शहर प्रतिनिधी)- नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या बिग बाजार या साखळी क्षेत्रातील मॉलवर तासाभरात दोन वेळेला कारवाई करण्यात आली. शनिवार आणि रविवारी विकऍन्डला संचारबंदीचे आदेश असताना आणि आरोग्य वगळता इतर सर्व अस्थापनां बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश असताना प्रेमदान चौकातील मनमाड रोडवर असलेल्या बिग बजार हा मॉल सुरू ठेवण्यात आलेला होता. तसेच यावेळी अनेक ग्राहक सहकुटुंब खरेदी करत गर्दी झालेली होती.

तोफखाना पोलिसांनी केला पाच हजार रुपयांचा दंड-
सावेडी उपनगरातील बिग बजार मॉल सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विभागावर लक्ष ठेवणारे पोलीस सहायक निरीक्षक किरण सुरसे यांच्या पोलीस पथकाकडून कारवाईचे आदेश दिले. सहा.पो.नि. सुरसे यांनी पाहणी केली असता बिग बाजार मॉल निरबंध असताना सुरू असून ग्राहकांची मोठी वर्दळ याठिकाणी दिसून आली. यावरून साथरोग कायद्यानुसार तोफखाना पोलिसांनी बिग बाजार मॉलवर कारवाई करत पाच हजार रुपयांचा दंड केला.

मनपाने पण मारली बिग बाजारवर धडक-
तोफखाना पोलिसांनी मॉलवर दंडात्मक कारवाई करून काही वेळ झालेला असतानाच मॉल सुरू असल्याचे दिसून आल्याने महानगरपालिका दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजन यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकत दंडात्मक कारवाई केली. मनपा दक्षता पथकाने पंचवीस हजार रुपयांचा दंड बिग बाजार मॉलला केला असून नियम मोडून पुन्हा मॉल सुरू दिसल्यास बिग बाजारवर मॉल सील करण्याची तंबी दिली आहे. या कारवाईत दक्षता प्रमूख – शंशिकात नजन,
सहाय्यक – नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, भास्कर आकुबत्तीन, अमोल लहारे,आनिल आढाव,बबन काळे,अजय कांबळे,राहुल शेंडे,राजेश आनंद कारवाई दरम्यान उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here