▪️देशात गेल्या 24 तासात 41,649 रुग्णांची भर, 593 जणांचा मृत्यू; राज्यातही काल दिवसभरात 7,431 रुग्णांना डिस्चार्ज; 6,600 रुग्णांची भर.
▪️नाशिकमधील नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आठ ऑगस्टला निर्णय; संमेलन होणार की नाही, यावर साहित्य महामंडळ निर्णय घेणार.
▪️राज्याची ब्रेक द चेनची नवीन नियमावली आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता;
▪️पुण्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सवलत नाही; महापालिकेकडून सुधारित नियमावली जारी.
▪️वीज बिल वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका; अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा वीज विभागातील अधिकाऱ्यांना सज्जड दम.
▪️मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाण्यात तिसरा एफआयआर; जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यासारख्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल.
▪️आसामचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मिझोरममध्ये गुन्हा दाखल; वाद पेटण्याची शक्यता.
➖➖➖
? Tokyo Olympics 2020
▪️पदकाच्या दावेदारांकडून निराशा, अतानू, अमित पंघाल, सीमा पुनियाचं आव्हान संपुष्टात.
▪️पीव्ही सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं! उद्या कांस्यपदकासाठी खेळणार.
▪️भारतीय महिला हॉकी संघाचा शानदार विजय, दक्षिण आफ्रिकेला 4-3 नं नमवलं, वंदना ठरली हिरो.
▪️वंदना कटारियाचा विक्रम, ऑलिम्पिकमध्ये गोलची हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖






