वैद्यकीय क्षेत्रातील रोजगारासाठी इच्छुकांसाठी प्रशिक्षण

524

वैद्यकीय क्षेत्रातील रोजगारासाठी इच्छुकांसाठी प्रशिक्षण

अहमदनगर: कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय क्षेत्रामध्ये प्रशिक्षीत व कुशल मनुष्य बळाची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेची घोषणा केलेली आहे. योजनेअंतर्गत जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना वैद्यकिय क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन रोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांना जिल्हयातील नामांकीत रुग्णालये, हॉस्पिटलमधून विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त व्ही. जे. मुकणे यांनी दिली आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ॲम्ब्युलंस ड्रायव्हर, असिस्टंट डयुटी मॅनजर-पेशंट रिलेशन सर्व्हिसेस, सेंट्रल स्टेराईल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंट, ड्रेसर (मेडिकल), डयुटी मॅनेजर (पेशंट रिलेशन सर्व्हिसेस), एल्डर्ली केअरटेकर (नॉन-क्लिनीकल), एमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन- बेसीक, हेल्थकेअर क्वालिटी ॲश्युरंस मॅनेजर, हॉस्पिटल फ्रंट डेस्क को-ऑर्डिनेटर, मेडिकल रेकॉर्ड ॲण्ड हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्निशीयन, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, पेशंट रिलेशन असोशिएट, फ्लेबोटोमिस्ट, प्रधानमंत्री आरोग्य मित्र, सॅनेटरी हेल्थ एड, जनरल डयुटी असिस्टंट इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. हया प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार नाही. या कोर्सेस करीता वयोमर्यादा 18 ते 45 इतकी आहे. हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व अधिक माहितीसाठी https://forms.gle/Z87Hp2XwS4NSTSS97 या गुगल लिंक वर फॉर्म भरुन पाठवावा. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 0241-2425566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here