महा सकाळच्या ठळक घडामोडी थोडक्यात.

846

▪️राज्यात काल दिवसभरात 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तसेच 12,645 रुग्ण झाले कोरोनामुक्त.

▪️भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा; काँग्रेसच्या नाना पटोले यांची मागणी.

▪️लातूरमध्ये NEET 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन सराव परीक्षेला परवानगी; प्रशासनाचा महत्वाचा निर्णय.

▪️सोन्याच्या दरात घसरण सुरुच; सोने 210 रुपयांनी तर चांदी 400 रुपयांनी घसरली.

▪️बसवराज बोम्मई कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोम्मई यांच्या नावाची केली अधिकृत घोषणा.

▪️Pfizer AstraZeneca लशीची परिणामकारकता दहा आठवड्यानंतर कमी होते; द लॅन्सेट जर्नलचा सर्व्हे.

▪️प्रतीक्षा संपणार! दमदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Force Gurkha SUV.

▪️ सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव; ग्रेट ब्रिटनकडून 4-1 नं मात.

▪️पीव्ही सिंधूचा आणखी एक दमदार विजय; प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये मारली धडक.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here