- आ. संग्राम जगताप यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक आज कोकणात पाठवण्यात आला. सुमारे २ हजार कुटुंबियांसाठी आरोग्यविषयक वस्तू, महिलांचे कपडे, ब्लॅंकेट आदी गोष्टी पाठवण्यात आल्या. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील असून मदतीचा ओघ यापुढेही सुरू राहील, असे जगताप यांनी सांगितले.

महाराष्ट्रावर जेव्हा-जेव्हा संकट येते तेव्हा-तेव्हा नगर जिल्ह्याने सदैव मदतीचा हात दिला आहे. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्याने महापूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. पुरग्रस्तांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असून आपण सुमारे २ हजार कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम आज केले आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, यासाठी संसार उपयोगी वस्तू, कपडे, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी वस्तू तसेच महिलांसाठी कपडे, ब्लॅंकेट आदींसह विविध जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक कोकणामध्ये पाठवण्यात आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील असून मदतीचा ओघ यापुढेही सुरू राहील. असे जगताप यांनी सांगितले

अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोकणामधील महापुरातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना संसारोपयोगी वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात देताना आदरणीय आमदार अरुणकाका जगताप, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा.माणिकराव विधाते, अभिजित खोसे, सुमतीलाल कोठारी, अशोक पितळे, कमलेश भांडरी, दीपक सुळ, संभाजी पवार, विजय गव्हाळे, संजय झिंझे, वैभव वाघ, संतोष लांडे, उबेद शेख, समद खान, सारंग पंधाडे, विनित पाऊलबुधे, अमोल गाडे, अंजली आव्हाड, सुनील त्रंबके, प्रा.अरविंद शिंदे,संजय ताठेड,लंकी खुपचंदानी, सुरेश बनसोडे,राजेश कातोरे,सोनू घेमुड,वैभव ढाकणे,माऊली जाधव आदी उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षापासून नागरिक कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना नगर शहरातील गरजू कुटुंबाना अन्नधान्यांचे वाटप केले आहे. त्याच पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. मागील वर्षीही कोल्हापूर वासियांना नगर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. यावर्षीही कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना येत्या दोन दिवसात पुन्हा मदत केली जाणार आहे. आपण सर्वजण सहलीसाठी कोकणामध्ये जात असतो, त्यामुळे त्यांच्या संकटकाळी ही सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वांनी पुढे यावे व मोठ्या प्रमाणात मदत करावी. असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले आहे.




