जातवैधता प्रमाणपत्राबाबत विद्यार्थ्यांसाठी झुम ॲपवर 29 जुलै रोजी वेबिनारचे आयोजन

    624

    जातवैधता प्रमाणपत्राबाबत विद्यार्थ्यांसाठी
    झुम ॲपवर 29 जुलै रोजी वेबिनारचे आयोजन

    सातारा दि. 26 (जिमाका) : ज्या विद्यार्थ्यांना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमात राखीव जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांना प्रवेश घेण्यापूर्वीच जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांनाऑनलाईन पध्दतीने जातवैधता प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक प्रक्रियेची माहिती होण्यासाठी गुरुवार दि. 29 जुलै 2021 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत झुम ॲपवर (Zoom App) वेबीनार आयोजित केला आहे. त्याचा मिटींग आयडी- 88004859896 व पासकोड 12345 असा आहे.
    तरी या वेबिनारचा सर्व विद्यार्थी, पालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, पाण्यापक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, इंटरनेट कॅफे चालक तसेच समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती स्वाती इथापे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.
    0000

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here