पाटील कुटुंबीयांचे सांत्वन…….
चिमुकल्या शिवन्याची उच्च शिक्षणापर्यंतची घेतली जबाबदारी…….
पुरात वाहून गेलेल्या म्हाकवे ता.कागल येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांचे भेट देऊन सांत्वन केले. तो नोकरीत असलेल्या रेमंड कंपनीसह, शेतकरी अपघात विमा, केडीसीसी बँकेची सभासद अपघात विमा यासह मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने एक लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली. तसेच सचिन यांची मुलगी कु. शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारीही घेतल्याचे यावेळी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी येथे ओढयावरून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज दोन दिवसानंतर मृत्युदेह सापडला. आज सकाळी त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला. तो कागल पंचतारांकित वसाहतीतील रेंमेंड कंपनीत कायम स्वरुपी नोकरीला होता. कर्त्या युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याने या कुंटुंबियांवर संकट ओढविले आहे. कर्ता कुटुंब प्रमुखच गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. यावेळी त्यांच्या लहान मुलीला तात्काळ एक लाख रुपयांची मदत व तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी हसन मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून पार पाडली जाईल.
या मदतीबरोबरच शासनाकडून पाच लाखांची मदत,कंपनीकडूनही या कुंटुंबियांला भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ना.मुश्रीफ यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुनिल संसारे, बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, माजी प स सदस्य ए. वाय. पाटील, सरपंच सौ. सुनिता चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, सिद्राम गंगाधरे, हिंदुराव पाटील, आकाराम पाटील, डॉ. विजय चौगुले, दिनेश पाटील, रघुनाथ पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, येथील पुरपरिस्थीतीची पाहणी करून हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.






