दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

776

▪️ टोकियाे ऑलिम्पिक : टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय. बॉक्सिंग स्टार मेरी कोमचाही विजय.. विजय मिळवत पी.व्ही. सिंधूचं पदकाच्या दिशेनं पहिलं पाऊल, तर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकरचं आव्हान संपुष्टात. हाॅकीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव..

▪️राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बाधितांना आश्वासन.. नुकसानाची पाहणी करताना चिपळूणमध्ये पूरग्रस्तांशी साधला संवाद. तळीये, पोसरे, मिरगाव, आंबेघर, ढोकावळे आणि चिपळूणच्या पेढे येथे दरड कोसळून आतापर्यंत 89 मृतदेह हाती, राज्यभरात दरड दुर्घटनांनंतर 34 जण अद्याप बेपत्ता, एनडीआरएफची माहिती..

▪️हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात सांगला घाट येथे जमीन खचल्यामुळे दरड कोसळली. पर्यटकांच्या कारवर दगडमातीचा ढिगारा पडल्याने दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू. सर्व मृत पर्यटक जयपूर (राजस्थान) आणि दिल्ली येथील रहिवासी.

▪️अर्धी सांगली पाण्यात! सांगलीकरांची धाकधूक वाढली, कृष्णेची पाणीपातळी 5 फुटांपर्यंत.. मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या..

▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचं राणेंचं आश्वासन

▪️घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे; रामदास आठवलेंकडून तळये दुर्घटनास्थळाची पाहणी.

▪️देशात गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 535 रुग्णांचा मृत्यू.. तर महाराष्ट्रात काल कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू, 6,269 नवीन रुग्णांची नोंद..

▪️पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं, महत्वाची माहिती हाती.. कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचारी बनले साक्षीदार, दीड वर्षात कुंद्राने पॉर्न फिल्म बनवून कमवले 20 कोटी!

▪️कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून, पूरामुळे मृत्यू झाले आहेत, महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.

▪️पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमधून भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब, मोदी, शहा यांचाही फोटो नाही. समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड.. चर्चांना उधाण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here