आर्यविन पूल सांगली येथील पाणीपातळी
उद्या सकाळपर्यंत 50 फूटापर्यंत होण्याची शक्यता
- कार्यकारी अभियंता ज्योती देवकर
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोयना धरण क्षेत्रात व धरणाच्या खालील बाजूस अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणसाठ्यात होणारी वाढ व विसर्गामुळे आर्यविन पूल सांगली येथे कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढत असून ती उद्या सकाळपर्यंत अंदाजे 48 ते 50 फूटापर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
00000