सध्या महागाई वाढत असताना, गॅस सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून अनेकांना एलपीजी गॅसवरील सबसिडी मिळणेही बंद झाले आहे. तुमच्या खात्यात हे अनुदान येत नसल्यास तुम्ही याबाबत तक्रार करु शकता..!
काही दिवसांपूर्वी सरकारने गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता तर गॅस टाकीवरील अनुदान बँक खात्यात येणेच बंद झाले आहे. याबाबत तुम्ही तक्रार करु शकता.
कशी कराल तक्रार..?
▪️गॅस सबसीडी खात्यावर जमा होते की नाही, हे जाणून घेण्यासाठी www.mylpg.in या वेबसाईटवर जा. उजव्या बाजूला ज्या कंपनीची गॅस टाकी आहे, त्या कंपनीवर क्लिक करा.
▪️तुम्ही याआधी ही सेवा वापरली नसेल, तर तुमचं खातं तयार करा. नंतर लॉगिन केल्यावर उजव्या बाजूला सिलिंडर बुकिंग हिस्ट्री पाहता येते. तेथे तुम्हाला कधी, किती सबसिडी मिळाली, हे दिसेल.
▪️सबसिडी मिळाली नसल्यास, तेथील ‘फीडबॅक’ पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा.
▪️शिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तक्रार करता येते.












