अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे.

688
पहा व्हिडिओ

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी शहरात अजंठा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे. या राड्यामध्ये तब्बल सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या जखमींवर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय तसेच अहमदनगरमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे पाथर्डी शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे.

दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी
मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. ही हाणामारी एवढी गंभीर होती की यामध्ये एकूण सात ते आठ जण जबर जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्यांना अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

गाड्यांची तोडफोड, लाखोंचे नुकसान
दोन गटांत झालेल्या टोकाच्या भांडणाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दोन्ही गटांतली लोकांनी दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली आहे. टोळीतील लोकांनी गाड्यांची केलेली तोडफोड व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. गाड्यांची तोडफोड केल्यामुळे या हाणामारीत लोखोंचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, ही घटना घडताच बाजूच्या लोकांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीसुद्धा घटनास्थळी दाखल होत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, या गंभीर प्रकारामुळे पाथर्डी शहरात सध्या तणावाचे वातवरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here