- अलमिरा इम्रान शेख हिचा पहिला रोजा
- अहमदनगर(प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अलमिरा इम्रान शेख (वय 5 वर्षे) या चिमुकलीने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्याच्या अवघड परिस्थितीत रमजानमध्ये पहाट ते संध्याकाळ अन्न, पाणी वर्ज्य करुन जवळपास चौदा तासांचा उपवास तीने केला आहे. पहिला रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) तिला फुलांचा हार घालण्यात आला होता. पहिला उपवास केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.






