• घाटीतील सुपर स्पेशलिटी ब्लॉक येथील ऑक्सिजन प्लान्ट पर्यंत ऑक्सिजन टँकर पोहचू शकत नसल्याने थोड्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जाण्याची शक्यता होती शिवाय रस्त्यावरील वळणावरून अपघाताची संभाव्य शक्यता नाकारता येण्यासारखी नाही ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या जागेची पहाणी करत ऑक्सिजन प्लांट जवळील भिंत पाडण्याचे आदेश PWDचे अभियंता कदिर यांना देत त्या जागी गुणवत्तापूर्ण गेट बसवण्याचे निर्देश देखील दिले होते.

• काल पुन्हा ऑक्सिजन प्लान्टची पहाणी करत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांच्या कामाचे कौतुक करत, आरोग्य सुविधेमध्ये कमतरता पडू देणार नसल्याचे सांगितले सोबतच रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना केल्या.