- #कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
- #यावेळी जिल्हातील आरोग्य यंत्रणेची क्षमता सुविधा,कोरोना नियमांचे पालन,सर्वसामान्यांची मते इत्यादी बाबींवर चर्चा झाली.
- #लोकप्रतिनिधीनी देखील त्यांची मते मांडली.
- #अजून लोकप्रतिनिधी आले असते तर त्यांच्या मुद्द्यांवर देखील चर्चा होऊन प्रश्नांचे समाधान मिळु शकले असते असे मत यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
- #सदरील बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, आ. हरीभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, घाटीच्या डॉ. वर्षा रोटे, यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





