सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. 11 एप्रिल 2021 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दि. 11 एप्रिल 2021 रोजी आयोगामार्फत आयोजित होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभागाशी सल्लामसलत करून परीक्षेची पुढील तारीख जाहीर करावी असे कळविले होते. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे.
00000