
आढावा बेठकी नंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, आयुक्त शंकर गोरे यांनी महानगरपालिकेच्या नटराज हॉटेल येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर बालिकाश्रम रोड येथील महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या भागाला भेट दिली. तेथील नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती घेतली.





