भाजपच्या सेवा सप्ताहात सहभागी व्हा! मनोज कोकाटे यांचे आवाहन
अहमदनगर : जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, गोरगरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकरी यांच्यासाठी देवदूताप्रमाणे कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताह म्हणून साजरा केला आहे. या सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी केले आहे.
ते म्हणाले, सेवा सप्ताह कालावधीमध्ये तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान, गरजू दिव्यांग यांना विविध वस्तू वाटप, कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप, विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याबरोबरच पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.













