रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः १८५७ चाचण्यात १०४ पॉझिटीव्ह

653

अकोला ,दि. ६ – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.५) दिवसभरात झालेल्या १८५७ चाचण्या झाल्या त्यात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काल दिवसभरात अकोला येथे २०९ चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट येथे ८७ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे २१ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे २८२ चाचण्या झाल्या त्यात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मुर्तिजापूर येथे ११९ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला महानगरपालिकेमार्फत १०२९ चाचण्या झाल्या त्यात ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोला आय एम ए येथे ३६ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २० चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४६ चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण १८५७ चाचण्यात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ११४ चाचण्या झाल्या पैकी ५६६६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here