पोलिसांना वाढदिवसाला मिळणार सुट्टी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले पोलिस अधीक्षकांचे कौतुक

पोलिसांना वाढदिवसाला मिळणार सुट्टी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले पोलिस अधीक्षकांचे कौतुक
मुंबई: सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवीन वर्षात एक अभिनव निर्णय घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांना आनंदीत केले आहे. सुट्याची वानवा असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवस हक्काची सुट्टी मिळणार आहे. सातपुते यांच्या या निर्णयाचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. या निर्णयामुळे पोलिस तणावमुक्त होऊन नव्या जोमाने काम करतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिले आहे की,

“पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पोलीस आपला खास दिवस कुटुंबीयांसोबत साजरा करू शकतील. यामुळे पोलीस तणावमुक्त होऊन नव्या जोमाने व प्रचंड उत्साहाने काम करतील, याची मला खात्री आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here