५० एपिसोडमध्येच निर्माते स्वप्निल मुनोत यांची झी युवावरील ‘तुझं माझं जमतंय’ मालिका ठरली १ नंबर!

सुप्रसिद्ध अभिनेते-निर्माते स्वप्निल मुनोत यांनी मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा आपला ठसा उमटविला आहे. त्यांची झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली आहे, अर्थात मालिका इतकी मनोरंजक आहे की प्रेक्षक देखील त्याविषयी चर्चा करतात असे दिसून आले आहे. नुकतेच या मालिकेने त्यांचे ५० एपिसोड पूर्ण केले असून केवळ ५० भागांतच या मालिकेने झी युवावर अव्वल ५० भागांत प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल आणि त्यांच्या टीमने ५० व्या भागांच्या यशाचे सेलिब्रेशन करून सर्वांची मेहनत आणि आनंद साजरा केला.
‘तुझं माझं जमतंय’ ही हलकी- फुलकी, दिलदार रोमँटिक कॉमेडी मालिका आहे. ही रॉमकॉम जॉनरची मालिका अश्विनी आणि शुभंकर यांच्या प्रेमकथे भोवती फिरत आहे. यामध्ये रोशन विचारे आणि मोनिका बागुल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अपूर्वा नेमलेकर यामध्ये ‘पम्मी’ नावाची सुंदर आणि दिलखेचक भूमिका साकारतेय. प्रेक्षक देखील या मनोरंजक कथानक असलेल्या मालिकेचा मनसोक्त आनंद घेत आहेत. एक अन एक एपिसोड प्रेक्षकांना स्वतःच्या प्रेमात पाडत आहे. फारच कमी वेळेत ही मालिका अनेकांची फेवरेट बनली.
निर्माते स्वप्निल मुनोत यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून आणि मेहनतीने, प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन एक सुपरहिट शो बनविला आहे. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्यासाठी “स्काय इज दी लिमिट”, प्रयत्न करत रहा, मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. याच त्यांच्या विचारसरणीमुळे स्वप्निल मुनोत यांनी नेहमीच नवनवीन गोष्टी अनुभवणे आणि अनुभवायला देणे या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे.
स्वप्निल हे स्वतः त्यांच्या कामामुळे, विचारसरणीमुळे सध्याच्या पिढीसाठी प्रेरणा आहेत पण ते उद्योजक, चित्रपट निर्माते नरेंद्र फिरोदिया यांना आदर्श मानतात. स्वप्निल यांनी त्यांच्या करिअरच्या प्रवासात बालकलाकार, अभिनेता, निर्माता म्हणून नेहमी प्रामाणिकपणे काम केलं आणि ‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन देखील केले आहे.