पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय कडून भारतीय संघ जाहीर!
17 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर हा कसोटी सामन्याचा भारतीय संघ जाहीर केला आहे.
▪️ पंत आणि शुभमन गिल यांनी सराव सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तरीदेखील, यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे.
सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे.
चांगला फॉर्ममध्ये असणारा गिल या कसोटी सामन्यात भारताला चांगले यश मिळवून देईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते. मात्र, या सामन्यातून वगळण्यात आला आहे.
पहिल्या सामन्यासाठी असा असणार आहे भारतीय संघ:
▪️पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असणार आहे.
▪️हनुमा विहारी हा एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे.
▪️मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖