मद्यसम्राट विजय मल्ल्या कंगाल, वकिलाला द्यायलाही नाहीत पैसे!

मद्यसम्राट विजय मल्ल्या कंगाल, वकिलाला द्यायलाही नाहीत पैसे!

भारतातल्या एसबीआयसह प्रमुख बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या फऱार झाला होता. आता लिकर किंग विजय मल्ल्या कंगाल झाला आहे. त्याला त्याच्या वकिलालाही देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत.

शुक्रवारी विजय मल्ल्याने एक तातडीचा अर्ज यु.के.च्या कोर्टात दाखल केला आहे. विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. ही बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत, असंही त्याने म्हटलं आहे

अर्जात काय?

▪️ फ्रान्समधील मालमत्ता विकल्यानंतर आलेल्या रकमेपैकी 14 कोटी रुपये आपल्याला देण्यात यावेत, अशी विनंती या अर्जाद्वारे विजय मल्ल्याने केली आहे.

▪️ कर्ज घोटाळा केल्याचा जो खटला सुरु आहे त्याची फी भरण्यासाठी आपल्याला पैसे हवे आहेत, असंही विजय मल्ल्याने या अर्जात म्हटलं आहे.

▪️ वेळेत फी दिली नाही तर आपण खटला लढणार नाही, असं विजय मल्ल्याच्या वकिलाने त्याला सांगितलं आहे, त्यामुळे त्याच्या अडचणीही वाढल्या आहेत.

मल्ल्याची सर्व संपत्ती लंडनमधील कोर्टाच्या निगराणीखाली आहे. कोर्टात खटला सुरु असेपर्यंत मल्ल्याला ही संपत्ती विकता येणार नाही. तसंच, ही संपत्ती तारण ठेवून कुणाकडून कर्जही घेता येणार नाही.

विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली. विजय मल्ल्यावर 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. जानेवारी 2019 मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here