शहरातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेडने ( एएससीडीसीएल ) डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे .
‘स्ट्रिटस् फॉर पिपल’ अंतर्गत शहरातील चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्यांना आकर्षित बक्षिस देण्यात येणार आहे.
इतकेच नव्हे तर निवडलेल्या डिझाईन्सचा विचार करून त्यादृष्टीने रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे .
केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गतच्या दी इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘ स्ट्रिटस् फॉर पिपल ‘ योजनेत औरंगाबाद महापालिकेने सहभाग नोंदविला आहे .
या अंतर्गत शहरातील रस्त्यांच्या आर्थिकदृष्ट्या विकास , नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येणार आहे .
पैठण गेट ते गुलमंडी ( मॅचवेल ),
क्रांती चौक ते गोपाळ टि चौक ,
सिडकोतील कॅनॉट परिसर , प्रियदर्शिनी गार्डन
आणि
एमजीएम दरम्यानचा रस्त्यांचा विकास याअंतर्गत करण्यात येणार आहे .